माझ्याबद्दल

दर वेळी वाटायचं …. आणि इतरांनी केलेले लिखाण वाचले की जास्तच वाटायचं ….. आपणही काहीतरी सुंदर, छान छान लिहावे. आपल्या भावनांना शब्दांची वाट द्यावी. शब्दांना स्वतःचा भाव, अर्थ असतो म्हणून तर आपण भावना बरेचदा शब्दात मांडू शकतो. एकदाका मनातले विचारांची आणि शब्दांची सांगड जमली की त्याची मज्जा काही औरच असते. मग हे शब्द आपल्या भोवती रुंजी घालून फिरत राहतात … भावना आणि शब्द यांचा सुंदर मिलाफ म्हणजे एखादी परिपूर्ण मैफलच. अशीच एक मैफल मी इथे भरवली आहे. कधी ती बेताल, बेसूर असू शकेल तर कधी ती उन्मादाच्या लाटेवर स्वार होवून कदाचित तुमच्या मनातील गाणं देखील गुणगुणेल. बघा ही मैफल किती आवडते ते ….
आता लिखाण करायचं म्हटलं की काहीतरी वेगळी identity नको का?? टोपणनाव असलं तर जरा बरं ….. आपण काही फार मोठे नाही की दिग्गज लेखकांप्रमाणे टोपणनावे मिरवायला. पण काय माहित पुढे मागे जर झालो मोठे तर त्यावेळी टोपण शोधात बसायची पंचाईत नको म्हणून हा प्रपंच. “अनुविना” कसं वाटतंय?? तुम्हाला कसाही वाटलं तरी मला आवडलंय त्यामुळे तेच ठेवलय. ज्या दोन व्यक्तींमुळे मला या इहलोकाची यात्रा घडली त्या दोन व्यक्तींच्या नावाचे हे “fusion” आहे.

7 Responses to माझ्याबद्दल

  1. तृप्ती खजांची says:

    अनुविना…तुझ्या विचारांचा आणि शब्दांचा प्रवास हा अथांग समुद्रा सारखा आहे ..
    शब्द आहेत बोलणारे…मनाची भाषा जपणारे…

  2. आज मराठी ब्लॉग विश्वमध्ये तुमचा ब्लॉग सापडला. सवडीने वाचतो. ही एक पोच देतोय :)

    पुलेशु !!!

  3. Datta Naphade says:

    Dear anand,
    This is simply wonderful. I was not aware of “Anuvina” till my daughter gave a clue about it.
    Best one on internet I have ever seen. I am virtually swimming in the subjects.
    With regards,
    Datta Naphade

    • anuvina says:

      धन्यवाद नाफडे काका,
      आपली प्रतिक्रिया वाचून खूप हुरूप आला. आपली विचारसरणी ही नेहेमीच जरा “हटके” राहिली आहे आणि तीच बरेच वेळा मला भावली. आपल्यासारख्या जाणकार व्यक्ती कडून परखड प्रतिक्रियेची अपेक्षा करत आहे. आपणांस जे वाटेल, रुचेल तशी प्रतिक्रिया द्या. सुधारणेला नेहेमीच वाव असतो.
      माझ्या ब्लॉग वर वाचन केलेत त्या बद्दल पुनश्च धन्यवाद. असेच भेट देत रहा.
      आनंद.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Connecting to %s

Follow

Get every new post delivered to your Inbox.

Join 886 other followers