
सरीवर येते सर
घेऊन हिरवा मोहोर
रानावनात गारवा
फुलापाना आला बहर
सरीवर येते सर
वाढे पावसाचा जोर
भिजलेल्या झोपडीला
थेंब थेंबाची झालर
सरीवर येते सर
मेघ धरू लागले ग फेर
विजांशी खेळताना
होतो वाराही मुजोर
सरीवर येते सर
वाहू लागले निर्झर
ओल्या अंगणात माझ्या
नाचू लागले ग मोर
सरीवर येते सर
जाऊ नको दूर दूर
तुझ्या मिठीत होईल
माझे आकाश बेजार.
सरीवर येते सर
झाले चांदणे धुसर
तुझ्या माझ्या सोबतीला
चिंब रातीचा प्रहर.




गीतांजली शेलार
जानेवारी 27, 2012 at 12:30 pm
छान !
देवेंद्र चुरी
जानेवारी 28, 2012 at 9:36 सकाळी
छानच …
Archana
फेब्रुवारी 1, 2012 at 9:51 सकाळी
अप्रतिम
anuvina
फेब्रुवारी 1, 2012 at 9:55 सकाळी
धन्यवाद गीतांजली, देवेंद्र आणि अर्चना.
तृप्ती खजांची
फेब्रुवारी 1, 2012 at 1:09 pm
पहिल्या प्रेमाच्या पावसात मन भिजून निघते …
पहिल्या पावसाच्या सरीने अंग ओलाचिंब होते …