हर हर बरसत श्रावण आला
फेब्रुवारी 3, 2012 यावर आपले मत नोंदवा
मला आवडलेलं एक अप्रतिम गाणं. श्रेष्ठ शास्त्रीय गायक प्रल्हाद अडफळकर यांनी गायलेलं. याचे गीतकार / संगीतकार कोण ते मला माहित नाहीत. हे गाणं कुणाकडे असल्यास मला coolgraphica-at-gmail-dot-com वर पाठवण्याची तसदी घ्यावी.
हर हर बरसत श्रावण आला | ओंकाराचा नाद गरजला |
उधंत अनुपम ईश्वर लीला ||
घन गंभीर हा मंत्र तापाचा | ब्रह्म व्यापुनी ईश्वर झाला |
आदी अनादी परमेशाचा | अथांग रूपी वेगवेगळा ||
लक्ष नभाच्या गाभाऱ्यातून | जीवा शिवाचा घोष चालला |
आत्मभूमीचा महायज्ञ हा | काळालाही नच आचरला ||
विश्वची झाले मंदिर अवघे | अद्भूत किमया नटेश्वराची |
परमात्म्याच्या ओंजळीतुनी | उधळून येता अगम्य प्राची |
कोण तापसी साद घालितो | चिंतनातुनी परमेशाला ||
हर हर बरसत श्रावण आला | ओंकाराचा नाद गरजला |
उधंत अनुपम ईश्वर लीला ||


