माझ्याबद्दल

दर वेळी वाटायचं …. आणि इतरांनी केलेले लिखाण वाचले की जास्तच वाटायचं ….. आपणही काहीतरी सुंदर, छान छान लिहावे. आपल्या भावनांना शब्दांची वाट द्यावी. शब्दांना स्वतःचा भाव, अर्थ असतो म्हणून तर आपण भावना बरेचदा शब्दात मांडू शकतो. एकदाका मनातले विचारांची आणि शब्दांची सांगड जमली की त्याची मज्जा काही औरच असते. मग हे शब्द आपल्या भोवती रुंजी घालून फिरत राहतात … भावना आणि शब्द यांचा सुंदर मिलाफ म्हणजे एखादी परिपूर्ण मैफलच. अशीच एक मैफल मी इथे भरवली आहे. कधी ती बेताल, बेसूर असू शकेल तर कधी ती उन्मादाच्या लाटेवर स्वार होवून कदाचित तुमच्या मनातील गाणं देखील गुणगुणेल. बघा ही मैफल किती आवडते ते ….
आता लिखाण करायचं म्हटलं की काहीतरी वेगळी identity नको का?? टोपणनाव असलं तर जरा बरं ….. आपण काही फार मोठे नाही की दिग्गज लेखकांप्रमाणे टोपणनावे मिरवायला. पण काय माहित पुढे मागे जर झालो मोठे तर त्यावेळी टोपण शोधात बसायची पंचाईत नको म्हणून हा प्रपंच. “अनुविना” कसं वाटतंय?? तुम्हाला कसाही वाटलं तरी मला आवडलंय त्यामुळे तेच ठेवलय. ज्या दोन व्यक्तींमुळे मला या इहलोकाची यात्रा घडली त्या दोन व्यक्तींच्या नावाचे हे “fusion” आहे.

27 thoughts on “माझ्याबद्दल

 1. अनुविना…तुझ्या विचारांचा आणि शब्दांचा प्रवास हा अथांग समुद्रा सारखा आहे ..
  शब्द आहेत बोलणारे…मनाची भाषा जपणारे…

  • धन्यवाद नाफडे काका,
   आपली प्रतिक्रिया वाचून खूप हुरूप आला. आपली विचारसरणी ही नेहेमीच जरा “हटके” राहिली आहे आणि तीच बरेच वेळा मला भावली. आपल्यासारख्या जाणकार व्यक्ती कडून परखड प्रतिक्रियेची अपेक्षा करत आहे. आपणांस जे वाटेल, रुचेल तशी प्रतिक्रिया द्या. सुधारणेला नेहेमीच वाव असतो.
   माझ्या ब्लॉग वर वाचन केलेत त्या बद्दल पुनश्च धन्यवाद. असेच भेट देत रहा.
   आनंद.

  • धन्यवाद चुरी साहेब. आपल्या सारख्या लोकांच्या मार्गदर्शन पर प्रतिक्रिया लाभल्या तर विचार अजून चांगल्या रीतीने मांडण्यास मदतच होईल. दिलखुलासपणे प्रतिक्रिया द्या …. चांगली, वाईट जशी असेल तशी.

 2. Can you guide me how to write in Marathi on this blog. Kup kahi sangayche ahe. Khup kahi wachayche ahe tuzya blog var. devane tula lihite kele ahe. Bhagyawan ahes. Lihinyachi kala phar thodyana awgat aste. tyatla tu ahes. Shabdanchi jadoo tula sadhali ahe. Jo chhan lihu shakto ani jo chhan gaau shakto ashan baddal mala nehmich heva watato. Lihita ho.

 3. Dear Anand,
  Thanks a lot. Tumhi Vegle Vegle lekh lihun amhas wachayla dilet. Khup chhan lekh astat tumche. Me awarjun wachat asto. Latest mhanje aapla ‘Importance Factor’ ha lekh khup chhan aahe. Wachtana real pictures dolyansamor aanto. Pach kalmi Bapu tar khup chhan aahe.

  Apple sagle lekh Khup chhan aahet. Asech lihit ja. Keep it Up.

 4. नमस्कार,
  मी आपल्या ब्लॉग वरचे ७ ते ८ लेख वाचले आणि मला ते खूप आवडते. काही लेक मी माझ्याजवळ नोद सुद्धा करून ठेवलेत.
  मला तुमचे लेख तर आवडलेच पण त्यापेक्षा तुमचा ब्लॉगचे मागील समुद्राचा देखावा जास्त आवडला.
  आपण असेच काही नवीन लेख लिहित राहा आणि आम्हास वाचायला संधी द्या.
  धन्यवाद,

 5. अनुविना.. मेल बॉक्समधे तुमचा अभिप्राय आला आणि तुम्हाला कुठे गाठावे ते कळेना. माझ्यासाठी हे सारे तंत्र अगदीच नवीन आहे. मला माझाच ब्लॉग धड वापरता येत नाही अजून. असो..! तुम्ही पाठवलेल्या अभिप्रायाबद्दल आभार..!!

  -मिथिला सुभाष.

 6. आमच्या मैत्री अनुदिनीच्या उपक्रमाला आपल्यासारख्या रसिक वाचकांची किती गरज आहे !
  आपण्सुद्धा जे लिहित आहात त्याचे कौतुक वाटते. आपल्या अनुदिनीमधील काही वैशिष्ट्यपूर्ण सुविधांविषयी आपल्याला विचारायचे आहे. कोणत्या इमेल पत्त्यावर लिहू ?
  मंगेश नाबर

 7. मी समीर,
  मी मराठी लाइव्ह या वर्तमानपत्रात काम करतो.
  मला तुमचा संपर्क क्रमांक मिळू शकेल काय?

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s