आपण कुणालातरी आवडणं…

(या कवितेचा कर्ताकरविता माहीत नाही. कुणाला माहित असल्यास जरूर सांगावे म्हणजे इथे त्यांचे नाव टाकता येईल)

किती छान असतं ना ? आपण कुणालातरी आवडणं…
कुणीतरी तासनतास आपलाच विचार करणं….
खरच !किती छान असतं ना आपण कुणालातरी आवडणं…

कुणाच्यातरी पर्सनल डायरित आपलं नाव असणं,
चार-चौघात कुणीतरी सतत आपलाच उल्लेख करणं,
किती छान असतं ना ? आपण कुणालातरी आवडणं…

कुणीतरी आपलं हसणं काळजात साठवनं,
कुणालातरी आपला अश्रू मोत्यासमान वाटणं…
किती छान असतं ना, आपण कुणालातरी आवडणं….

कुणीतरी आपल्या फोनची तासनतास वाट पाहणं ,
आपल्याला एकदा ओझार्त पाहण्यासाठी ,
तासनतास बस स्टॉप वर उभं राहणं ,
देवसमोरही स्वताआधी आपलं सुख मागणं ,
खरच !किती छान असतं ना आपण कुणालातरी आवडणं…

कुणीतरी डोळ्यात जीव आणून आपली वाट पाहणं ,
आपल्या उपवासा दिवशी त्यानं ही हटकून उपाशी राहणं,
खरच !किती छान असतं ना आपण कुणालातरी आवडणं…

कुणीतरी आपला विचार करत पापणी वर पापणी  अलगद  टेकवण ..
झोपल्यावर मात्र स्वप्नातही आपल्यालाच पाहणं….
खरच, खूप छान असतं ना आपण कुणालातरी आवडणं….असतं ना

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s