व्हालेंटाईन डे – एक फ्याड

१४ फेब्रुवारी, प्रेमी युगुलांचा हक्काचा दिवस. अगदी तो जर मनाप्रमाणे साजरा नाही झाला तर जगबुडी होईल इतका महत्वाचा. इतर काही अचरट पाश्चात्य रुढींच्या पावलावर पाउल ठेवून खोल वर रुजून माजलेली संस्कृती. या दोन ओळींवरूनच तुम्हाला वाटले असेल की माझे प्रेम-बीम या गोष्टीं मध्ये स्वारस्य नाही किंवा मी काही राजकीय पक्षांप्रमाणे उगीच व्हालेंटाईन डे विरोध करत आहे. तर तुमचा काही तरी गैरसमज झाला आहे. माझा विरोध आहे व्हालेंटाईन डे या बाजाराबद्दल. त्याबद्दल जे काही हाईप केले जाते त्या बद्दल. शिळ्या काढीला ऊत आणावा त्या प्रमाणे दर वर्षी ही प्रसार माध्यमे आणि तरुणाईला आकर्षित करणारे त्यांचे फंडे या प्रेमाच्या काढीला ऊत आणत असतात. सुट, फ्री, व्हालेंटाईन डे स्पेशल अश्या अनेक प्रलोभनांचा बाजार भरलेला असतो. आणि हीच प्रलोभने अश्या वेड्या प्रेमविरांना अलगद जाळ्यात ओढतात. बरोबर आहे वर्षातून एकच दिवस ही प्रजा यांच्या तावडीत सापडते, मग हे त्यांची झोळी भरून घेणारच. या दिवसाची वाट पहात बसलेल्या बऱ्याच कंपन्यांसाठी हा एक इव्हेंट असतो इव्हेंट. आणि वर्षातून एकदाच प्रेमाच्या नावाखाली फसवण्याची नामी संधी.

मुळात प्रेम अभिव्यक्त करण्यासाठी कुठला अमुक एक दिवसच लागतो हेच मला पटत नाही. प्यार किया तो डरना क्या असं म्हणत ते व्यक्त करताना स्थळ, काळ आणि वेळ अशी क्षुल्लक बंधने हवीतच कशाला? दम असेल तर प्रत्येक दिवस प्रेम दिवस साजरा करावा. पण केवळ पैश्याच्या जोरावर नव्हे तर भावनांच्या कुशीत प्रेमाची उब घेत साजरा करावा. सध्या तरी बाप बेअकली आणि आई निर्बुद्ध असं माननारी बहुतांशी महाविद्यालयीन पिढी (जास्त करून यांचातच हा दिवस अती उत्साहात साजरा केला जातो) आपल्या जोडीदाराचा काय आदर राखणार? या व्हालेंटाईन डे ला असलेल्या जोडीदाराबरोबरच पुढील व्हालेंटाईन डे साजरा करू की नाही याची शाश्वती नसलेला हा बहुसंख्य वर्ग या दिवशी वारेमाप उधळपट्टी करतो. का??? केवळ जोडीदाराला खुश करण्या साठी किंवा जोडीदार मिळवण्यासाठी. पैश्याच्या मोलाने झालेले प्रेम हे क्षणभंगुरच असणार. त्याचा किंवा तिचा होकार/मर्जी मिळवणं हे जर देण्यात येणाऱ्या भेट वस्तू/प्रकारावर अवलंबून असेल तर ते प्रेम नसून नुसता दिखावा आहे असे समजावे.

अनावश्यक महत्व प्राप्त झालेल्या या व्हालेंटाईन डे समारंभाला याच डोळ्यावर पट्टी बांधलेल्या प्रेमवीरांनी डोक्यावर चढवून ठेवलं आहे. अरे कोण तो व्हालेंटाईन? आपल्या अखंड भारत वर्षात कधी कुणी प्रेमच केली नाही? उद्या हाच व्हालेंटाईन डे जर अती होवून डोक्यात गेला तर काहीतरी नवीन करण्याच्या नादात नागवे होवून “आदम आणि ईव्ह डे” पण साजरा करतील. भारताच्या एकूणच परंपरेचा इथे विसर पडलेला दिसतो. शून्याचा शोध भारतात लागला. सोनी महिवाल, हिर रांझा, मुमताज शाहजहान अश्या प्रेमिकांचा इतिहास या भारतातील मातीतच घडला. प्रेमाचे अंतिम स्वरूप ज्याला मानलं जातं ते “कामसुत्र” अस्सल भारतीयच. अश्या वेळी आपण मात्र अंधानुकरण करण्यात गुंग आहोत. दिवाळीच्या वरताण व्हालेंटाईन डे साजरा करण्याचा अट्टहास. महागडी शुभेच्छा पत्रे (greeting cards), भेटवस्तू ई. गोष्टी “व्हालेंटाईन डे स्पेशल” हा शिक्का मारून दामदुप्पट किमतीने विकली जातात आणि मुर्खासारखी विकत घेतली जातात. हॉटेल, रेस्टॉरंट, रिसोर्ट, पब हे तर ओसंडून वहात असतात. प्रेमाच्या नावावर लयलूट चालू असते. तुम्ही त्यांच्या तालावर “लय” धरा आणि ते तुमची “लुट” करतील. येणाऱ्या जोडप्यांसाठी “वेलकम ड्रिंक्स” काय, “कॅन्डल लाईट डिनर” काय, जेवणाचा “व्हालेंटाईन डे स्पेशल मेन्यू” काय …. अजून काय काय ते विचारू नका. अजून एक गाजर दाखवलं जातं ते म्हणजे “एका वर एक फ्री”. अरे कसलं डोंबल फ्री? एकतर आधीच किंमत वाढवून सांगितली जाते किंवा दर्जाची पार वाट लागलेली असते. एकावर एक फ्री ची मस्त सवलत असते ती “स्पा आणि मसाज सेंटर” वाल्यांची. दोघांसाठी प्रवेश …. बर मग आता दोघांना एकदम रगडणार, वेगवेगळ्या वेळी रगडणार का दोघांनी एकमेकांना रगडून घ्यायचं हे सगळं गुलदस्त्यात. ;).

जे स्वतःच्या जीवावर मज्जा करतात त्यांचं ठीक आहे. जे कमावणार ते उधळणार देखील. पण ज्यांना अजून कमवायची अक्कल आलेली नाही अश्या पिढीचं काय? ही पिढी म्हणजे “आयजी च्या जीवावर बायजी उदार” अशी आहे. बरं उद्दिष्ट साध्य नाही झालं तर दुष्कृत्याकडे वाटचाल ठरलेली …. उधारी आणि चोऱ्यामाऱ्या. बरेचदा एक फुल दो माली किंवा एक माली दो फुल झालं की होते पंचाईत. जितकं प्रेम आंधळं तितकंच त्याच्या प्रेमळ विकृती देखील जहाल असतात. एखादा नकार ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसलेली मुलं एकतर मानसिक हानी करून घेतात किंवा विकृतीच्या विकोपाला जाऊन मुलं असिड फेकायला तयार होतात आणि मुली हाताच्या नासा कापून घ्यायला तत्पर असतात. हेच अराजक या व्हालेंटाईन डे ला डोक्यावर घेतल्या मुळे होतं.

अरे प्रेम कसं असावं? जसा अत्तराचा अविरत सुगंध, पहाटे अंगणात पडलेला पारिजातकाचा सडा, सप्तसुरांची उधळण, रेशमाचा स्पर्श, चंदनाची शीतलता, कापसासारखं मऊ, प्रसंगी वज्राप्रमाणे कठोर देखील. प्रेम म्हणजे पहाटेची सोनेरी किरणे जी आयुष्याच्या संजवातीला देखील साथ देतील. अशी प्रेमळ साथ मिळाली तर प्रत्येक दिवस व्हालेंटाईन डे होईल. नाहीतर दरवर्षी व्हालेंटाईन डे ला वेगळाच जोडीदार असेल तुमच्या पैश्यांवर मज्जा मारायला. 😉

व्हालेंटाईन डे च्या समस्त रसिकांना अनेक शुभेच्छा.

9 thoughts on “व्हालेंटाईन डे – एक फ्याड

  • अर्चना,
   या लेखात आवडण्या सारखे खरंच काही नाही. सध्याच्या परिस्थितीत जी नाहक उधळण चालते त्या बद्दल माझे व्यक्तिगत मत मांडले आहे. कुणी कुठला क्षण कसा साजरा करावा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. फक्त कुठल्यातरी भावनिक हिंदोळ्यांवर स्वार होवून तारतम्य सोडून वर्तणूक नसावी हीच मनस्वी इच्छा.
   अनुविना

  • कोष्टी साहेब,
   मी वैश्विक प्रेम दिवस साजरा करण्याच्या विरुद्ध मुळीच नाही. पण कुठलाही सण साजरा करण्यासाठी जे तारतम्य बाळगायला हवे ते सध्याच्या पिढीमध्ये अभावानेच दिसून येते. चांगल्या गोष्टी अंगीकारल्या जात नाही याची पण खंत आहेच.
   माझं म्हणाल तर जे खरं प्रेम आहे ते मला १५ वर्षापूर्वीच मिळाले आहे …. अजूनही अबाधित आणि तितकंच उत्कट.
   धन्यवाद,
   अनुविना

  • aajchi pidhi apanch ghadavto ahot………
   baherche lok purvi pan hote…..kami pramanat…..

   dont blame globalisation

   if u cant do anything to inform ur children about the culture of ur country and state ……then only u r responsible for that and no one else…….

   and the” survival of the fittest ” chi theory ithe hi lagu hote….

 1. हा दिवस साजरा करण्यात आपले ज्या व्यक्तीवर प्रेम आहे तिच्यासाठी आपल्या कुवतीवर पडलेल्या मर्यादा ओलांडणे सामान्य माणसालादेखील शक्य आहे याकडे दुर्लक्ष होते याला माझा आक्षेप आहे.

 2. not agreed….

  we have no rite to comment either on anybodies celebrations or feelings or capacity to pay …..
  r u raising the some kind of voice for other things that this commercial people do who have glorified this day?
  they have raised these days to a new glory to make money only ……
  mahit ho adhi kunala …there is a doctors day ? fathers day ? mothers day ? daughters day ? sons day ?
  mhanje yecha artha bakichya divshi he lok existant nastat ka?
  just like that they have brought a new glory to this day…….
  and people are cashing on it…
  sale asla ki dukanala daha pat gardi astech …….. same way …….eka divshi jar sagle udhan and udhalpatti 2 lokani eka meka sathi keli tyat evdha baval ka?

  new years chya partya var koni objection nahi raise kele? that is also aping the western countries blindly ….rite ???

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s