मुंबईत मतदानाचा बोजवारा

संपूर्ण भारतात प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या मुंबई महानगर पालिकेची काल निवडणूक झाली. केवळ ४६% मतदान झाले. (संदर्भ: दैनिक पुण्यनगरी). या टक्केवारी मध्ये चाळीतील तसेच झोपडपट्टीतील मतदारांची संख्या जास्त असल्याचे आढळून आले आहे. ती का आहे याच्या मागे वेगळाच “अर्थ” असू शकतो. पण त्यामुळे उच्चभ्रु, उच्च मध्यमवर्गीय आणि टॉवर संस्कृती मधील नागरिकांना मतदानाचे सोयरसुतक नव्हते का? इथे बक्कळ पैसा कमवायचा आणि अराजकतेवर मनपा वर ताशेरे ओढायचे इतकीच यांची जबाबदारी आहे का? “मै अन्ना हूँ”, “मी अण्णा” अश्या टोप्या घालून रस्त्यावर उतरणारे लोकांनी संविधानाच्या मुलभूत हक्काकडे पाठ फिरवली. हा भ्रष्टाचार नाही का? की केवळ पैसे खाल्ले म्हणजेच भ्रष्टाचार होतो? अण्णांच्या पाठी मेणबत्त्या घेउन भ्रष्टाचाराविरुद्ध फिरणाऱ्या हातांना बोटावर उमटणाऱ्या शाईचे महत्व माहीत नसावे असे समजणे म्हणजे निर्बुद्धतेचे लक्षण आहे. “Flash Mob” साठी कुठेही जमणाऱ्या लोकांना स्वतःच्या प्रभागातील मतदान केंद्रावर जाण्याची गरज वाटली नाही?

आज याच ५४% टक्के लोकांच्या निरुत्साहामुळे मुंबई मनपा वर सक्षम सरकार येऊ शकणार नाही ही एक सामाजिक खंत आहे आणि ती पुढील ५ वर्षे बाभळीच्या काट्याप्रमाणे टोचत राहील. काल ज्यांनी मतदानाचा हक्क न बजावता एका अर्थाने संविधानाचा अवमान केला आहे त्यांना आता नैतिकरित्या मनपाच्या कामकाजावर बोलण्याचा अधिकार नाही. तरी बरं …. न्याय व्यवस्थेने उमेदवार लायक नसेल तरी आपले मत कुणासही न देता मतदानाचा हक्क बजावण्याचा अधिकार दिला आहे. त्यामुळे “मला कुठलाच उमेदवार लायक वाटत नसल्याने मी मतदान केले नाही” ही सबब चालणारी नव्हती. अर्थात ही तरतूद आधी पासूनच होती पण त्या बद्दलची जागरुकता आत्ता निर्माण झाली आहे. मतदान करायचे नाही आणि मग भ्रष्टाचार झाला की मेणबत्त्या घेऊन फिरायचे याला काही अर्थ आहे? एक महाराष्ट्रातील नेता म्हणाला ते बरोबर आहे, सचिनचे शतक हुकले तर परत १५ दिवसांनी सामना आहेच, एखाद्या हिरोचा सिनेमा पडला तर ६ महिन्यांनी दुसरा येणार आहे, पण ज्यांनी कालची संधी जाणूनबुजून हुकावली त्यांना पुढील ५ वर्षे ती संधी परत मिळणार नाही. आणि त्यांनी पुढील ५ वर्षे मनपाच्या कार्यप्रणालीवर तक्रार न करणेच उत्तम. साधी बोंब पण मारणे उचित होणार नाही.

मित्रांनो एक अमुल्य संधी दवडलीत. आता बसा ….. असेच.

5 thoughts on “मुंबईत मतदानाचा बोजवारा

  • आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. एक विनंती आहे …… कृपया below the belt शिव्या या ब्लॉगवर देऊ नयेत. मतदान केले पाहिजे असे म्हणणे fashion झालेली नाही. जनजागृतीची मात्र अजून गरज आहे. बाकीचे सगळे नालायक आहेत असे ज्यांना वाटते त्यांनी स्वतः मैदानात उतरावे. तसेच नकारात्मक मत नोंदणी कायद्याने ग्राह्य धरली आहेच. या वरची अधिक माहिती http://indiacurrentaffairs.org/rule-49-o-weapon-for-the-indian-voters/ इथे वाचावयास मिळेल.
   धन्यवाद.

 1. पिंगबॅक मतदाना नंतर… मुंबई « अनुविना

 2. मी तुमच्याशी अगदी १०० % सहमत आहे. पण मला वाटतं कि जर समोरचे उमेदवार नालायक असतील तर तिथे जाऊन मतदान न करण्यापेक्षा तिथे न गेलेलंच बरं असा विचार करणं अगदी साहजिक आहे. कारण rule ४९ O जर पहिला तर त्यात फक्त एवढंच लिहिलेलं आहे….
  49-O. Elector deciding not to vote.-If an elector, after his electoral roll number has been duly entered in the register of voters in Form-17A and has put his signature or thumb impression thereon as required under sub-rule (1) of rule 49L, decided not to record his vote, a remark to this effect shall be made against the said entry in Form 17A by the presiding officer and the signature or thumb impression of the elector shall be obtained against such remark.
  आता अशा केसेस मध्ये निर्वाचन आयोग काय निर्णय घेते हे कळायला मार्ग नाही.आणि ते reelection वगैरे कितपत खरं आहे माहिती नाही. पण this is not an excuse for not voting of course. मतदान करण्यात येणारा दुसरा अडथला म्हणजे मतदान करायला आपल्या गावीच जावं लागतं. online मतदान करण्याची सुविधा का असू नये.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s