सब घोडे बारा टक्के

(देशाच्या राजकारणावर कविवर्य विंदा करंदीकरांनी केलेली सर्वकालीन मार्मिक कविता)

जितकी डोकी तित्तकी मते; जितकी शिते तितकी भुते|
कोणी मवाळ, कोणी जहाल; कोणी सफेद, कोणी लाल|
कोणी लट्ठ, कोणी मट्ठ; कोणी ढिले कोणी घट्ट|
कोणी कच्चे, कोणी पक्के; सब घोडे बारा टक्के||

गोड गोड जुन्या थापा; जुन्या आशा नवा चंग|
जुनी स्वप्ने, नवा भंग|
तुम्ही तरी करणार काय; आम्ही तरी करणार काय|
त्याच त्याच खड्डया मध्ये; पुन्हा पुन्हा तोच पाय|
जुना माल नवे शिक्के; सब घोडे बारा टक्के||

जिकडे सत्ता तिकडे पोळी; जिकडे टक्के तिकडे टोळी|
“ज्याचा पैसा त्याची सत्ता” पुन्हा पुन्हा हाच कित्ता|
पुन्हा पुन्हा जुनाच स्वार; मंद घोडा अंध स्वार|
यांच्या लाथा त्यांचे बुक्के; सब घोडे बारा टक्के||

सब घोडे! चंदी कमी; कोण देईल त्याची हमी?
डोक्यावरती छप्पर तरी; कोण देईल माझा हरी?
कोणी तरी “देईन” म्हणा; मीच फसविन माझ्या मना

भुकेपेक्षा भ्रम बरा;
कोण खोटा कोण खरा?
कोणी तिर्या कोणी छक्के,
सब घोडे बारा टक्के!

2 thoughts on “सब घोडे बारा टक्के

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s