मतदाना नंतर… मुंबई

“नेमेची येतो मग पावसाळा” असा हा दर ५ वर्षांनी येणारा मतदानाचा पावसाळा मुंबईत हलक्या सारी पडून गेला. हलक्या म्हणण्याचे उद्दिष्ट असे की मुंबईत झालेले ४६% मतदान. (अधिक माहिती साठी वाचा ‘मुंबईत मतदानाचा बोजवारा’) आधी शिवसेनेने आपली सत्ता अबाधित राखली त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. नुसत्या हिंदुहृदय सम्राट यांचा करिष्मा त्याना किती दिवस तारणार देव जाणे. “करून दाखवलं” या एका वाक्याने मुंबई जिंकली असं म्हणता येणार नाही तर आता हाती लागलेली ५ वर्षे “मुंबईकरांनी दिलेला बोनस” समजून “करून दाखवावे” लागणार आहे. नाहीतर शत्रू दारावर टपलेलेच आहेत. आज शिवसेनाभवनाच्या परीसारात मनसेला मिळालेलं यश सेनेसाठी डोके दुखी होणार आहे. आणि करून दाखवलं नाही तर पुढील ५ वर्षानंतर मुंबईतलं चित्र वेगळे असू शकते. त्यामुळे सेना नगरसेवकांनो सावधान. तुम्ही तुमच्या वॉर्डची काळजी नाही घेतलीत तर त्याचा फायदा मनसे घ्यायला तयार असेल. कारण राष्ट्रवादी आणि काँग्रसला स्वतःच्या भानगडीत जाणते साठी वेळ मिळणार नाही म्हणून त्यांचे नाव घेतले नाही.

या वेळी शिवसेना, भाजपा आणि रिपाई यांनी महायुती केली. रिपाई ला किती फायदा झाला हा प्रश्न त्यांनाच विचारलेला बरा. खरं तर त्यांनी त्याचे आत्मपरीक्षण करणं जरुरीचे आहे. दर वेळी दुसऱ्याच्या खांद्यावर हात ठेवून आपले नशीब बदलत नाही. आंबेडकरी जनतेची ससेहोलपट केंव्हा संपणार ते त्यांनाच ठावूक. मा. बाबासाहेबांनंतर एकाही सक्षम नेता मिळू नये हे त्यांचे दुर्दैव आणि डोळ्यावर पट्टी बांधून फिरणारे त्यांचे नशीब. युतीला देखील या महायुती वर किती भरवसा आहे ते थोड्या दिवसातच जाणते समोर येईल जेंव्हा आठवले त्यांच्या नेहेमीच्या अर्धवट मिटलेल्या डोळ्यांनी त्यांच्या मागण्या मांडतील. महायुती जरी सत्तेवर येणार असली तरी त्यांना सर्वात मोठा धक्का मनसे ने दिला आहे. अर्थात त्यामुळे सध्या तरी त्यांचे नुकसान काही झाले नसले तरी त्याची झळ दोन्ही कॉंग्रेसला बसली हे निश्चित. शिवसेनेला संपवण्याच्या वल्गना करणाऱ्या या दोन्ही कॉंग्रेसला काळतच नव्हतं की आपण एकत्र काम करायचंय की वेगवेगळं. त्यांच्यात नसलेल्या एकसूत्रीपणाचा पूर्ण उपयोग ठाकरे द्वयींनी करून घेतला. …. नाही नाही त्यांना तो आपोआप झाला.

शेवटी काही झालं तरी अत्ता काय आणि पुढे काय ठाकरे बंधू हेच मुंबईचे अनभिषिक्त सम्राट राहणार हे अजून एकदा सिद्ध झाले. आणि ते जनतेनेच दाखवून दिले. तीच गत ठाण्यात झाली. राष्ट्रवादी समजत होती ठाण्यात आनंद परांजपे सर्वेसर्वा आहेत. एकदा त्याला फिरवला की ठाण्यात सत्ता आपलीच …. पण तो ही त्यांचा भ्रमनिरास झाला. दोन्ही काँग्रेसना बाकी ठिकाणी बहुमत मिळाले असेलही पण शेवटी मुंबई ती मुंबईच आणि पिंपरी-चिंचवड ती पिंपरी-चिचवड. मुंबई जिंकण्याची शान कुठेही नाही.

तात्पर्य …
१. मिळालेल्या विजयाने शिवसेनेने हुरळून न जाता पुढील ५ वर्षे “जागते राहो” या अविर्भावात काम करणे गरजेचे आहे.
२. तुम्ही नाही केलंत तर मनसे टपलेलीच आहे.
३. टगेपणा आणि अंतर्गत हेवेदावे कमी करून दोन्ही कॉंग्रेसना पुढील ५ वर्षांसाठी अजेंडा तयार करावा लागेल.
४. रिपब्लिकन पार्टी तसेच समस्त आंबेडकरी जनतेला सक्षम नेतृत्व उभे करणे गरजेचे आहे. बाबासाहेबांच्या पुण्याईवर हे नेते जास्त काळ टिकू शकणार नाहीत.
५. मनसेला फुकटचा सल्ला “नाशिकच्या संधीचे सोने करा …. ५ वर्षांनी मुंबई फुकट मिळेल”
६. पुढील ५ वर्षात जनतेने आपली अनासक्ती सोडून मतदानाकडे गांभीर्याने बघावे नाहीतर बोंब पण मारता येणार नाही.

5 thoughts on “मतदाना नंतर… मुंबई

  1. उत्कृष्ट लिहिता आपण..
    ब्लॉग ची मांडणी सुंदर आहे..
    मी सुद्धा थोडे फार लिखाण करतो माहिती तंत्रज्ञानाविषयी.. आपल्याकडून प्रतिक्रिया नक्कीच अपेक्षित आहे.. http://themarathi-blog.blogspot.in/

  2. मुंबईतले पांढरपेशी मतदानासाठी रांगा लावण्यास कमीपणा समजतात..फक्त एसीमध्ये बसून राजकारण्यांना शिव्या देण्याचा उद्योग करत असतात..मतदान करणं वगैरे काही आपला प्रांतच नाही..आपलं काही बिघडत नाही अशी माजोरी वृत्ती या उरलेल्या ५५ टक्के मतदान न केलेल्या लोकांमध्ये असते…त्यांना राजकारणावर टीका करण्याचा त्यांना शिव्या देण्याचा काहीएक अधिकार नाही…म्हणूनच मतदान सक्तिचं केलं पाहिजे…

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s