ठाणे: महायुती की आघाडी

आज ठाण्याचा महापौर ठरणार. मतदारांनी आपले काम बजावले आणि आता वेळ आली आहे ती निवडून आलेल्या नगरसेवकांची आणि त्यांच्या पक्षांची. कुणाचे राजकारणातील गणित चुकलंय आणि कुणाचे बरोबर आलाय ते आजचा सूर्य मावळायच्या आताच कळेल. या घोडेबाजाराच्या पार्श्वभूमीवर गेल्या शनिवार रविवारी जे काही झालं त्याला बिचारा मतदार काहीच करू शकत नाही, हा या राजकारण व्यवस्थेचा तोटा आहे.

नगरसेविका सुहासिनी लोखंडे यांचे अपहरण (?) झाले किंवा नाही. ….. असल्यास ते आघाडीतील नेत्यांनी केले असणार. हे समजून आल्यावर मातोश्री वरील बैठक ….. आणि त्या नंतर झालेलं राडा संस्कृतीचे सामाजिक प्रदर्शन. सर्वसाधारण मतदाराला वाटत असेल …. खरंच यांची लायकी आहे का?? एक नगरसेविका गायब होते याचा अतिरेक इतका जोर जबरदस्तीने करावा??? तोडफोड, मारझोड, बंद ई.ई. …. ज्या मतदारांच्या समोर यांनी पदर पसरून भीक मागितली त्यांनाच आपले काम झाल्यावर वेठीस धरले …. कारण काय तर निव्वळ एक नगरसेविका गायब झाली म्हणून???? आता पक्षातील महान नेते म्हणतील ….. राग अनावर झाला की कार्यकर्ते उद्रेक करणारच …. आणि वर हे पण म्हणायचे की कार्यकर्ते आमच्या शब्दाच्या बाहेर नाहीत. मग हा उद्रेक चालू असताना पक्षातील नेते आपले तोंड बंद करून बसले होते का? या प्रश्नाचे उत्तर अपेक्षित नाही …. आणि मिळणार देखील नाही. आघाडी मध्ये पण टगे आहेत …. दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये विशेष फरक नाही. पण मागे एकदा शरद पवारांच्यावर जो हल्ला झाला आणि त्या नंतर शरद पवारांनी कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचे आवाहन केले. त्यांच्या विनंतीस योग्य मान दिला गेला.

ठाणेकरांनो सांभाळा …. महायुती आली तर राडे वरच्यावर होत राहतील. टगे आले तरी फार काही फरक पडणार नाही. पण तुम्हाला परत संधी आता ५ वर्षांनी …… या ५ वर्षानंतर येणाऱ्या निवडणुकांत आपले मत कुणास द्यायचे याचा अभ्यास, पूर्वतयारी आत्ताच चालू करा. शेवटी नगरसेवक निवडून द्यायचं आपल्या हातात आहे…. सत्ता कुणाची असेल हे आपण ठरवू शकत नाही हीच शोकांतिका आहे.

2 thoughts on “ठाणे: महायुती की आघाडी

 1. आपला ब्लॉग वाचुन आनंद झाला. ब्लॉग च्या अध्यक्षांना नम्र विनंती आहे कि त्यांनी डिजीटल मराठी वाचनालयाचे ओळख चिन्ह तुमच्या ब्लॉग वर प्रस्थापित करावे. आपले जाहीर आभार. धन्यवाद.

  ओळख चिन्ह लावण्यासाठी

  १) प्रथम तुमच्या ब्लॉग मध्ये Add Widget आणि मग HTML / JavaScript सिलेक्ट करावे

  २) त्यामध्ये खालील कोड कॉपी करून पेस्ट करावे

  <a

  ३) शेवटी ते सेव करावे

  पुनश्च धन्यवाद.

  आपला नम्र

  यशोधन वाळिंबे

  कार्याध्यक्ष

  ( डिजीटल मराठी वाचनालय )

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s