व्हायरस

out dated झालंय आयुष्य   |   स्वप्नही download होत नाही
संवेदनांना ‘virus’ लागलाय   |   दु:खं send करता येत नाही

जुने पावसाळे उडून गेलेत   |   delete झालेल्या file सारखे
अन घर आता शांत असतं   |   range नसलेया mobile सारखे

hang झालेय PC सारखी   |   मातीची स्थिती वाईट
जाती माती जोडणारी   |   कुठेच नाही website

एकविसाव्या शतकातली   |   पीढी भलतीच ‘cute’
contact list वाढत गेली   |   संवाद झाले mute

computer च्या chip सारखा  |   माणूस मनानं खुजा झालाय
अन ‘mother’ नावाचा board,   |   त्याच्या आयुष्यातून वजा झालाय

floppy Disk Drive मध्ये   |   आता संस्कारांनाच जागा नाही
अन फाटली मनं सांधणारा   |   internet वर धागा नाही

विज्ञानाच्या गुलामगिरीत   |   केवढी मोठी चूक
रक्ताच्या नात्यांनाही   |   आता लागते facebook

ही कविता राज्यव्यापी शिक्षक साहित्य संमेलनासाठी, श्री बबलू वडार (शिक्षक -कोल्हापूर) यांनी लिहिली होती. कविता पठण स्पर्धेत त्यांना पहिला नंबर मिळाला.

2 thoughts on “व्हायरस

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s