बडे अच्छे लगते है

मी अगदीच नाईलाज असेल तरच टीव्ही वर लागणाऱ्या मालिका बघतो. लोकाग्रहास्तव कधी कधी अश्या गोष्टी कराव्या लागतात. त्यात घरामध्ये पुरुषांपेक्षा स्त्रियांची संख्या जास्त असेल तर असे प्रकार वरचे वर होत असतात. कधी कधी रिमोटचा ताबा मिळालाच तर आजकाल माझी चिमुरडी पोर पण मला हटकते “बाबा … माझा अभ्यास झाला आहे आणि आता पोगो वर छोटा भीम लागणार आहे … आईने परमिशन दिली आहे”….आता हा एकतर्फी संवाद झाल्यावर रिमोट तिच्या स्वाधीन करण्यावाचून गत्यंतर नसतं. अशीच काहीशी वेळ माझ्या बायको आणि आईच्या बाबतीत पण होते. अर्थात सगळ्याच मालिका बकवास नसतात. पण त्यांच्यातील तोचतोचपणा, प्रदीर्घ कालावधी आणि दिखाऊपणाचा विट आला आहे.

अशीच एक हिंदी मालिका “बडे अच्छे लगते है” मागील वर्षी मे २०११ ला सोनी वाहिनीवर चालू झाली. वेगळा विषय, उत्तम दिग्दर्शन, सशक्त कथा (पण इतर मालिकांच्या पठडीतीलच) असल्याने काही दिवसातच लोकप्रिय झाली. ४० वर्षाचा उद्योगपती राम कपूर …. त्याने नाईलाजास्तव केलेलं लग्न. त्याच्या बायकोची भूमिका साक्षी तंवर ने केली आहे. सावत्र भाऊ, सावत्र आई, मित्र, म्हातारी आजी असा बाकीचा मसाला आहेच. एकता कपूरने प्रसवलेल्या अनेक मालिकां पैकी ही एक मालिका. हो … प्रसवलेल्या मालिका, कारण जसं भावंडांमध्ये साधर्म्य असतं तसच हिच्या सगळ्या मालिकांमध्ये काही ना काही साम्य असतं. एकताला प्रसुती वेदना कदाचित झाल्या नसतील पण कालांतराने श्रोत्यांना त्याचा ताप निश्चित होतो.

आज पर्यंत सगळं उत्तम चाललेल्या या मालिकेत १२ मार्च २०१२ च्या भागात काही तरी अघटीत आणि अतर्क्य घडलं. आजकाल चित्रपटांमध्ये गरमा गरम प्रणय सीन काही नवीन राहिला नाही. पण त्याचा अजून भारतीय मालिकांमध्ये शिरकाव झालेला नाही. तो त्या दिवशी या मालिकेच्या रुपाने झाला. मालिकेतील या भागात अर्धा अधिक वेळ नायक नायिकेच्या प्रणयावर खर्च केला. चित्रपटांपेक्षा बराच सोज्वळ प्रणय दाखवला गेला असला तरी चुंबनांच्या रुपाने त्या प्रणयाने परिसीमा गाठलीच. जिथे ही मालिका एका “कौटुंबिक” सदरात गणली जाते तिथे ही अशी दृश्ये दाखवली जाणं हे छोट्या पडद्यावर पुढील काळात दिसणाऱ्या नव्या प्रणय प्रसंगांची नांदी ठरणार आहे. शेवटी डर्टी पिक्चर च्या निर्मातीने मालिकेत पण डर्टी दाखवण्याचा पराक्रम केलाच.

अधिक माहिती : बडे अच्छे लगते है    |    १२ मार्च च्या भागाचे संक्षिप्त रूप    |    लेखाचा आधार

6 thoughts on “बडे अच्छे लगते है

 1. huh !

  mi pan naailaajanech baghato. khar tar star pravahchya sagalya malikaat ek saarakhepana aahe. mhanaje pratyek maliket sunela mul hovu shakat nahi, he kas kay shakya aahe?

  dusarikade janhavi ne kaay karav mhanun lokana vicharat aahe 🙂

  marathit uttam sahitya nahich ka ? ha khapate mhanun kahihi khapavayach? aata he chumban drushya …. kalas aahe.

  • प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यासाठी कुठल्याही थराला जायची यांची तयारी असते. आणि वर तोंड करून बोलायला मोकळे “पब्लिकला जे पाहिजे तेच आम्ही देतो” ही बातमी वाचून मला खरंच कळत नाहीये की कुठल्या कुठल्या वाहिनीला “Child Lock” लावावे लागेल. 😉

 2. हम्म्म्म… तसं ममी टीव्ही बघत नाही, पण ह्या एपिसोडची लिंक फेसबुकवर मित्राने शेअर केली होती.

  बाकी काय बोलावं? आपण पाश्चात्य संस्कृतीकडे जातोय ह्याचे उत्तम उदाहरण.. आगे आगे देखो होता हैं क्या 🙂 🙂

 3. हम्म्म्म… तसं मी* टीव्ही बघत नाही, पण ह्या एपिसोडची लिंक फेसबुकवर मित्राने शेअर केली होती.

  बाकी काय बोलावं? आपण पाश्चात्य संस्कृतीकडे जातोय ह्याचे उत्तम उदाहरण.. आगे आगे देखो होता हैं क्या 🙂 🙂

  • उत्तम ….. तुम्हीपण असल्या टुकार मालिका बघत नाहीत ते. मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की नको त्या गोष्टीना प्राधान्य देण्यात मग्न असलेली आपली मिडिया या मालिकेतील कामुक आणि उत्तान दृश्याबद्दल चकार शब्द देखील काढायला तयार नाही. पाश्चात्य संस्कृतीचे अंधानुकरण हा वेगळाच विषय आहे. प्रेक्षकांची सद्सद्विवेकबुद्धी मेल्यात जमा असल्याची लक्षणं आहेत ही.

 4. सुरुवातीला हि मालिका बर्री वाटली होती. पण नंतर पुन्हा ’ये रे माझ्या मागल्या’ करत एकताने नेहमीचंच दळण दळायला सुरुवात केली. परवाचा उपरोल्लेखित भाग तर ……
  <<<>>> १००% सहमत !

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s