महाकैवल्यतेजा

सौजन्य: ई साहित्य प्रतिष्ठान

संत ज्ञानेश्वरांच्या जीवनकार्याची एक छोटीशी झलक म्हणजे महाकैवल्यतेजा हे ई पुस्तक. या पुस्तकाची original ई कॉपी आपणासमोर ठेवताना आम्हाला प्रचंड आनंद होत आहे. महाकैवल्यतेजा हे चरित्र नव्हे. ज्ञानेश्वरांसारख्या महान युगप्रवर्तकाच्या जीवनाची ओळख करून घ्यावी अशी उत्सुकता निर्माण करण्याचे काम हे पुस्तक करील अशी भावना यामागे आहे. ज्ञानेश्वर जेव्हा अत्यंत गहन असे विचार इतक्या सुंदर रितीने मराठीत मांडत होते आणि आपल्या ओव्यांनी आणि अभंगांनी लोकांना मंत्रमुग्ध करत होते तेव्हा इंग्रजी ही एक गावठी भाषा होती, तिला लिपी नव्हती आणि साहित्याचा गंधही नव्हता. आज इंग्रजीने सारे विश्व व्यापायला घेतले आहे आणि आपली सुंदर मराठी भाषा कोपर्‍यात ढकलली जात आहे. पण इतिहासाला हिंदी सिनेमाप्रमाणे “दि एंड” नसतो. इतिहासाच्या उकळत्या पाण्यात आज जे खाली ते उद्या वर जाऊ शकते. म्हणून या सुंदर मराठीच्या सौंदर्याचा आस्वाद नव्या पिढीला लागावा, चट लागावी आणि नवतरुणांनी जुने मराठी साहित्य धुंडाळावे आणि नवे निर्माण करावे या साठी हा प्रपंच. इंटरनेटवर सुंदर सुंदर मराठी साहित्त्य असावे हा ई साहित्य प्रतिष्ठानचा ध्यास आहे. आणि हे साहित्य जगभरातल्या मराठी कुटुंबातल्या मुलांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न आहे. या प्रयत्नात तुमची साथ हवी. साता समुद्रापार मायबोलीची पताका फ़डकावी  हे तो श्रींची ईच्छा. मराठी भाषेला नव्या ई युगात मानाच्या स्थानावर नेण्याच्या असंख्य लोकांच्या प्रयत्नाला आम्ही हातभार लावू शकतो यात आम्हाला आनंद आहे. इंग्रजी भाषेत सुमारे चार लाखांहून अधिक ई पुस्तके आहेत. या ई युगात मराठीला मागे राहून चालणार नाही. म्हणून आपल्यासारख्या वाचकांच्या पाठिंब्यासह आम्ही वाटचाल करत आहोत. आजवर आम्ही नियतकालिके आणि ई-पुस्तकांची १८० प्रकाशनं केली अहेत. आणि जिद्द आहे इंग्रजीच्या महासत्तेला टक्कर देण्याची. माझी “अमृताते पैजा जिंकणारी” मायबोली, आम्हाला ही पैजही जिंकूनच देईल असा आम्हांला ठाम विश्वास आहे.  हे पुस्तक आपल्या ओळखीच्या लोकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी घेणार ना तुम्ही? तुमच्या सुचना आणि आयडियाच्या कल्पनांचे स्वागत आहे.

ई साहित्य प्रतिष्ठान.

ई पुस्तक: महाकैवल्यतेजा

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s