ट्विटर, पूजा आणि चड्ड्या

आत्ताच याहू या संकेतस्थळाच्या मुख्य पानावर एक बातमी झळकली “सन्नी लिओनच्या अंतर्वस्त्रांचा लिलाव” आणि माझे डोळे चमकले. सन्नी लिओन जेंव्हा पासून बिग बॉस मध्ये आलीये तेंव्हा पासून ती किती भारतीय आहे याचे दाखले दिले जात आहेत आणि प्रत्येक जण आपापल्या परीने तिला गटवण्याचा प्रयत्न करत आहे. अमेरिकेतील एक नावाजलेली पोर्न स्टार भारतात येते काय आणि सगळ्या आंबट शौकिनांच्या नजरा “काही दिसतंय का?” हे बघण्यासाठी भिरभिरतात काय. बरोबर आहे जे आधी लपून छपून छोट्या पडद्यावर बघितलं आहे ते पूर्ण कपड्यात कसं दिसतं या साठीचा सगळा आटापिटा असावा कदाचित. हे सगळं करता करता तिला महेश भट्टच्या निर्लज्ज मुलीने, पूजाने आपल्या गळाला अडकवली आणि सन्नी तिचा पहिला भारतीय चित्रपट करायला तयार झाली. तेंव्हा देखील सन्नीच्या “मी कितीही भारतीय चित्रपट केले तरी माझा मूळ धंदा सोडणार नाही” अशी ग्वाही दिली होती. वा वा … स्वतःच्या रोजीरोटी बद्दल किती हा अभिमान.

चित्रपटाचे चित्रीकरण सुरु झाल्या झाल्या या पूजाने तिच्या ट्विटर वर खुमासदार बातम्या द्यायला सुरुवात केली …. हा सुद्धा आजकालचा जाहिरातबाजीचा स्टंट असतो. मागे एकदा अशीच याहू वर बातमी आली होती. जिस्म ची टीम श्रीलंकेत चित्रीकरण करत असताना पूजा म्हणत होती, “रणदीप हुडाने एक मोठा प्रेम प्रसंग पूर्ण करण्यात १ दिवस घेतला” आणि हा रणदीप पण म्हणतो “खुपच दमछाक झाली प्रेम प्रसंगाचे चित्रीकरण करताना”(बातमीचा दुवा). बरोबर आहे रणदीपचं घामटा निघाला असेल कारण कितीही म्हटलं तरी सन्नी बाई एकदम सराईत. तिच्या साठी रोजचाच रोजीरोटीचा उद्योग ….. प्रेम प्रसंग काही नवीन नाही .. उलट अश्या अर्ध कपड्यात अवघडली असेल ती. असो कोण किती अवघडलं होतं ते चित्रपट बारीवर झळकल्यावर कळेलच.

आता हीच पूजा भट्ट या चित्रपटात काम केलेल्यांच्या चड्ड्या, इतर कपडे यांचा लिलाव करून सामाजिक संस्थाना दान देणार आहे म्हणे. केंव्हा कसं कधी ते तिच्या टीव टीव वर बघायला मिळेल. तिची टीव टीव नेहेमी बघण्याचं आग्रहाचं निमंत्रण देखील दिले आहे. असो, आम्हाला इंटरेस्ट बातम्यांमध्ये …. चड्ड्या आमच्याकडे देखील आहेत. ही पूजा भट्ट अजून कुणा कुणा घट्ट पोर्नस्टारला आणते ते तिलाच माहित. 😉

9 thoughts on “ट्विटर, पूजा आणि चड्ड्या

 1. हा सर्व प्रकार तसा विचित्र वाटतो खरा, मात्र लोक काय विकतील आणि काय-काय विकत घेतील याचा काही नेम.
  लिखान आटोपशीर आणि मार्मिक होते, धन्यवाद.

 2. इतके दिवस जोहर आणि चोप्रा अनिवासी भारतीय संस्कृतीचे तद्दन खोटे चित्र दाखवत होते. म्हणजे कितीही कमी कपडे घालून बाहेर मिरवल तरी घरात पंजाबी ड्रेस किंवा चुडीदार घालून पूजा करणे व भारतीय मुल्ये व संस्कृती जपणे
  आता पूजा अस्सल परकीय संस्कृती दाखवत आहे तर त्यात काय वावग आहे.
  ज्यांना पहायचे आहे ते पाहतील ज्यांना संत तुकाराम पाहायचा आहे तो ते पाहतील
  सनी च्या पूर्वी पामेला आणि परीस येऊन गेल्या त्यांनी धंदा म्हणून नाही हौस म्हणून टेप केल्याच होत्या.

  • निनाद साहेब,
   अगदी मार्मिक बोललात. ज्यांना जे पहायचे आहे ते पाहतील. देशात बी ग्रेड सिनेमा पण भरपूर येतात आणि ते पहायला लोकं पण असतात. सनीच्या अगोदर पामेला येउन गेली, अजून बऱ्याच कोणी कोणी येऊन गेल्या असतील. आणि कदाचित त्या वेळी त्यांनी आपल्या चड्ड्या या पूजा भट ला दिल्या नसतील. ;). वावगं याचं वाटतं की काही वर्ष्यापूर्वी तत्कालीन समाजाचा विचार करून “सेक्सी सेक्सी सेक्सी मुझे लोग बोले” या गाण्याचे शब्द बदलून “बेबी बेबी बेबी मुझे लोग बोले” असं काहीतरी गुळमुळीत गाणं बनवलं. आणि आता याच समाजाची मानसिकता किती बदलली आहे याचा प्रत्यय येत आहे. आपली एखादी वस्तू विकण्यासाठी, त्याचं मार्केटिंग करण्यासाठी पूजा भट सारखी लोकं कुठल्या थराला जाऊ शकतात याचं उत्तम उदाहरण म्हणजे हा वस्त्र विक्री समारंभ असेल. घराघरात सनी सारख्याच अनेक मदनिकांचे दर्शन लपून छपून घेतलं जात असेलच आणि त्या बद्दल लिहिलेला हा लेखच नाही.

 3. कठीण आहे 😦
  बिनाभांडवली धंदा आहे तिचा.. लोकं पण आहेतच हूंगायला तयार.. पूर्वी पूजा बेदी ने पण आपली चड्डी ऑक्शन केली होती असे काहीसे आठवते. 🙂

  • पूजा बेदी ही अशी व्यक्ती आहे की ती काही पण ऑक्शन करू शकते. परदेशातील कुठल्याश्या मॉडेलने स्वतःचे कौमार्य ऑक्शन केले होते असे वाचण्यात आले होते. निदान अजून ती चढाओढ तरी आपल्या इथे अजून चालू झालेली नाही. (आणि ते करणे सध्या तरी पूजा बेदीला शक्य नाही … श्या: चान्स हुकला बिच्चारीचा 😉 )

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s