गुलाबांचे प्रदर्शन

RoseExhibition

डोंबिवलीला प्रदर्शने आणि निदर्शने काही कमी नाहीत. दोघानांही सपाटून गर्दी होते. डोंबिवली मध्ये काही काही ठिकाणी तर कायमच प्रदर्शन भरलेले असते. डोंबिवलीतील बालभवन येथे आमदार रविंद्र चव्हाण यांनी २५ ते २७ जानेवारी या कालावधीत “डोंबिवली रोझ फेस्टिवल” आयोजित केला होता. डोंबिवली मध्ये गुलाब प्रेमींची “डोंबिवली रोझ सोसायटी” आहे. मागच्या वेळचे प्रदर्शन काही कारणास्तव बघायचे राहून गेले होते. डोंबिवलीत अश्या प्रकारचे फुलांचे प्रदर्शन क्वचितच भरते. प्रदर्शनात भाग घेणाऱ्यांचा सहभाग हाच कदाचित महत्वाचा प्रश्न असावा कारण जाणकार आणि रसिक प्रेक्षकांची वानवा नाही.

शनिवारी सकाळी प्रदर्शन बघायला जायचं ठरवलं. बोरिवलीहून भाचा आलाच होता. मी, तो आणि माझी मुलगी असे तिघे जण बालभवनला पोहोचलो. गेट मधून आत शिरल्या शिरल्या परिसरात वेगवेगळया जातीची, प्रकारांची, रंगांची गुलाबाची रोपटी विकावयास ठेवली होती. आत शिरल्या शिरल्याच आर्याने जाताना एकतरी गुलाबाचे झाड घेऊन जायचे असे वदवून घेतले. वातावरण निर्मिती तर झकास झाली होती. प्रदर्शन दुसऱ्या मजल्यावर होते. जाताना जिन्यामध्ये गुलाबाची माहिती देणारे फलक लावले होते. दर महिन्यात गुलाबाच्या रोपट्याची कशी निगा राखावी, त्याला कुठली फवारणी करावी, कुठले खत घालावे याची सविस्तर माहिती त्या फलकांवर दिलेली होती. प्रत्येक पायरी गणिक कुतूहल वाढत होतं. विशेष म्हणजे इतर प्रदर्शनात माहितीचा भडीमार करणारे जाहिरातीचे फलक कुठेही दिसले नाहीत.

प्रदर्शनाच्या दालनात शिरताच क्षणी डोळ्यासमोर जे बघितलं त्यावर विश्वास बसत नव्हता. इतके विविध प्रकारचे गुलाब मी कधीच एका ठिकाणी बघितले नव्हते. पूर्ण दालन गुलाबमय झालं होतं. विविध आकाराचे विविध रंगाचे शेकडो गुलाब प्रदर्शनात ठेवले होते. त्या हॉल मध्ये नुसती एक फेरी मारली तर १ मिनिट पण नाही लागणार पण तिथे या फुलांच्या राजाला बघता बघता दीड तास कसा निघून गेला ते कळलंच नाही.

आमदार रविंद्र चव्हाण यांनी चालू केलेल्या अनेक अभिनव उपक्रमांपैकी गुलाबांचे प्रदर्शन ही डोंबिवलीकरांना एक आगळी वेगळी पर्वणीच आहे. या रोझ शो साठी पुणे, मुंबई, शहापूर, वांगणी, नागपूर ई. अनेक ठिकाणच्या रोपवाटिका, हौशी मंडळींनी सहभाग घेतला होता. १४ प्रकारचे गंध असलेली,  ४०० जातींची जवळ जवळ २५०० गुलाबांची विविध रंगी फुले प्रदर्शनात मांडण्यात आली होती. तीन दिवसांच्या या प्रदर्शनाला अंदाजे १०-१५ हजार नागरिकांनी भेट दिली. वांगणीच्या श्री. आशिष मोरे यांच्या गुलाबाला “गुलाबांचा राजा” तर श्री. विकास म्हसकर यांच्या गुलाबाला “गुलाबांची राणी” पुरस्कार मिळाले. डबल डिलाईट, रोझ ऑफ मिलेनियम (दोन कळ्यांचे एक फूल) या प्रदर्शनाचे विशेष आकर्षण होते. डोंबिवली रोझ सोसायटीच्या वतीने दरवर्षी हा उपक्रम दरवर्षी केला जाईल असा मानस आमदार रविंद्र चव्हाणांनी व्यक्त केला.

डोंबिवलीकरांना इतक्या छान छान गुलाबांच्या राज्यात फेरफटका मारायची संधी आ. रविंद्र चव्हाण यांनी त्या बद्दल त्यांचे आणि डोंबिवली रोझ सोसायटीचे शतशः धन्यवाद. डोंबिवलीत अशी अजून अनेक प्रदर्शने व्हावीत जेणे करून डोंबिवलीकरांना निसर्गाची माहिती मिळेल आणि निसर्गाबद्दल आस्था निर्माण होईल.

(माहिती स्त्रोत: मुंबई मिरर)

7 thoughts on “गुलाबांचे प्रदर्शन

 1. भारतात पाहुणे येऊन आपल्या झालेल्या वनस्पतींपैकी गुलाब खरोखर देशी झालाय!
  रंग, रूप अन सुगंधासारखीच याची पूर्वकथा देखिल शाही आहे… त्याच्या भोवती प्रेमकथा, वंशवाद, राजकारण अन कलाप्रेम सगळ्या मसालेदार कहाण्यांचा गोतावळा आहे! अन अजूनही गुलाब पाहून झुकला नाही असा माणूस सहसा दिसत नाही!
  एकदम भारी पोस्ट आहे…. गुलाबांचे फोटो पाहूनही गार वाटतंय!! कागदाला लावता येतं तसं ब्लॉगला देखिल सुगंधी बोट लावता येत असतं तर काय बहार आली असती!!

  • धन्यवाद अनु,
   उगीच नाय रोज डे साजरा करत कॉलेज मधे. 😉
   बाय द वे. गुलाबाच्या काही जाती अगदी इथल्याच आहेत अस्सल भारतीय. त्यांचे शास्त्रीय नावच Rosa indica असं आहे. indica म्हणजे इंडीयन, इथल्या मातीतला. देशी. 😉

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s