सोळावं वरीस घाताचं

Article-Age16

महिलांवरील वाढत्या अत्याचाराला रोखण्यासाठी परस्पर संमतीने शरीरसंबंध ठेवण्यासाठी असलेली वय वर्षे १८ ही वयोमर्यादा कमी करून १६ वर आणण्याचा घाट दिल्ली दरबारी घातला गेलाय. या प्रकाराने महिलांवरील अत्याचार कसें कमी होतील याचा अर्थ लागतं नसल्याने राजकारण्यांना बौद्धिक गुप्तरोगाने पछाडले असावे असे वाटते.

सध्याच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात मुलांना शारीरक उमज वयाच्या १३-१४व्या वर्षीच आलेली असते. यासाठी चित्रपट, टेलिव्हिजन, इंटरनेट या सारख्या माध्यमांचे आभार मानावे तितके कमी आहेत. संमतीने शरीरसंबंध ठेवण्याचे वय १६ केले असले तरी विवाह योग्यतेच्या वयाच्या अटी बद्दल काहीच वाच्यता करण्यात आली नसल्याने बरीच गडबड होऊ शकते. कायदेशीर विवाहासाठी मुलाचे वय २१ तर मुलीचे वय कमीतकमी १८ मानण्यात आलेले आहे. आता या कायदेशीर नियमा मुळे कुठलीही व्यक्ती अनिर्बंध पण स्वसंमतीने शरीरसुखाचा उपभोग घेऊ शकणार आहे. कुठलीही १६ वर्षे पूर्ण झालेली मुलगी २ वर्षे तर मुलगा तब्बल ५ वर्षे अश्या पद्धतीने (अ)नैतिक शरीरसंबंध प्रस्थापित करू शकतो. या मुळे खरंच महिलांवरील अत्याचाराला पायबंद घालता येतील?

या नियमा मुळे अजून एक मोठं संकट या महिला वर्गावर येऊ शकतं. आता कित्येक लांडगे सोळा वर्षाची कोवळ्या कळीला नासवण्यासाठी बाजारात टपून बसतील. कित्येक दलाल या मुलीना आपल्या जाळ्यात फसवून ओढून घेण्यासाठी जीवाचं रान करतील. जिथे जाणत्या वयातील मुली फसतात तिथे या बालिकांची काय कथा. राष्ट्रीय पातळीवर दिवे लावून झाल्यावर आता हे राजकारणी सामाजिक पातळीवर उतरून आपल्या दाराशी आलेले आहेत. पालकांना आता डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवायला लागणार आहे. संकुचित कुटुंबांच्या पार्श्वभूमीवर जिथे आई वडील दोन्ही जण ८-८ तास कामानिमित्त घराबाहेर असतात त्यांना अधिक सजग रहावे लागेल. हे नेहेमीचेच आहे … राजकारणी करून जातात आणि त्याची धग मात्र सामान्य माणसाला भोगावी लागते.

अर्थात या सगळ्या गोष्टी आत्ता चालू नाहीयेत असं नाही. शाळा सुटल्या नंतर ९वी – १०वी च्या मुलांना लपून छपून बऱ्याच गोष्टी करताना बघितलं आहे. १८ वर्षाची मुलगी सांगून कित्येक कमी वयाच्या मुली वेश्या व्यवसायाला जोडल्या आहेत. पण हे सगळं लपून छपून, कुणाच्याही न कळत. आता हे सगळं होईल अगदी उघडपणे, डोळ्यादेखत ….. आणि कायदेशीर रित्या. त्यामुळे सोळावं वरीस आता नुसतं धोक्याचं राहिलं नसून घाताचं झालेलं आहे.

6 thoughts on “सोळावं वरीस घाताचं

    • धन्यवाद धवल,
      अनुदिनीवर स्वागत. आपण म्हणताय ते काही अंशी बरोबर आहे पण त्याला आपण पण तेवढेच जबाबदार आहोत नाही का?

  1. आजच्या पेपरला एक बातमी आहे, रेल्वेचा एक कर्मचारी सेक्स रॅकेट चालवायचा. मुलींना बिना तिकिट पकडले की जेल मधे जावे लागेल अशी भिती दाखवून अनैतिक मार्गाला लावायचा.
    काय बोलावं समजत नाही, मूर्खपणाची कमाल आहे झालं.

    • सगळीकडेच अनागोंदी आहे. सामान्य जनतेला कायद्याचा नीट अभ्यास नाही त्यामुळे कायद्याची भीती उठता बसता दिली जाते. कायदा समाजाच्या भल्या साठी बनवला गेला आहे हे कधी समजणार? राजकारण, समाजकारण यांच्या सकट देशातील सगळ्याच संस्था भ्रष्ट असल्यावर अजून काय अपेक्षा सामान्य माणूस ठेवणार?

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s