टिक टिक वाजते डोक्यात

Anuvina-DuniyaDari

हा लेख लिहिण्याच्या आधी आणि तुम्ही वाचायला सुरुवात करण्या आधी एक प्रकर्षाने नमूद करू इच्छितो. मी चित्रपट विश्लेषक/समिक्षक नाही कारण चित्रपट हा एक आभास असून त्याचा फ़क्त आस्वाद घ्यावा तसेच त्याच्या तांत्रिक बाबींचे आकलन मला नसल्याने जो आभास मनाला भावतो तो दृकश्राव्य पातळी वर आवडतो. यात माझ्या मनात तरी दुमत नाही. हा लेख वाचुन चित्रपट बघायला गेलात आणि तो आवडला नाही तर कृपया अनुविना ला जबाबदार धरु नये.

गेल्या आठवड्यातच संजय जाधव यांचा दुनियादारी हा चित्रपट झळकला. चित्रपटाचा गाभा सुहास शिरवळकरांच्या “दुनियादारी” या सुप्रसिद्ध कादंबरी वर बेतलेली असल्यामुळे “मस्ट वॉच” यादीत होता. अंकुश चौधरी, स्वप्नील जोशी, जितेंद्र जोशी, संदीप कुलकर्णी, उदय टिकेकर, उदय सबनीस, सुशांत शेलार, सई ताम्हणकर, उर्मिला कानेटकर आणि वर्षा उसगांवकर हे सगळे ३ तासात धुमाकूळ घालणार हे अपेक्षित होतं.  त्यात संजय जाधव ने झी च्या सोबत चित्रपट प्रसाराचा जो धडाका लावला होता त्याची फळे त्याला “हाऊसफुल्ल” च्या पाट्यांना लगडलेली दिसली असतील. अगदी लक्स साबणाच्या जाहिरातीत देखील दुनियादारीचे प्रमोशन बघून बर वाटलं. चिन्मय मंडलेकर ने पटकथा लिहिताना बऱ्या प्रमाणात स्वतःची कथा घुसडली आहे. अजय-समीर चे संगीत पण उत्तम. मोजकीच ४ गाणी असली तरी मूळ कथानकात घुसवल्या सारखी वाटत नाहीत. “देवा तुझ्या गाभाऱ्याला” या गाण्यात अजय-अतुल ची झाक दिसते. “जिंदगी जिंदगी” या गाण्याने आधीच कॉलेजचे कट्टे काबीज केलेत.

हा चित्रपट बघायला जाणार्या प्रेक्षकांची दोन प्रकारात विभागणी होऊ शकते. त्याचे विश्लेषण सविस्तर देत आहे.

१. ज्यांना सु.शि. आणि पर्यायाने “दुनियादारी” माहित नसलेला प्रेक्षक वर्ग-

एक चांगला करमणुक प्रधान मराठी चित्रपट म्हणून बघायला हरकत नाही. पूर्वार्धात घडणार्या घटना प्रत्येकाला आपल्या कॉलेज दिवसांची आठवण करून देतात. कॉलेजचे दिवस, बुडवलेले वर्ग, लायब्ररी, लपून छपून केलेली आणि लागलेली व्यसनं सगळं सगळं आठवतं त्या ३ तासात. अगदी १९७० च्या सुमारास ही कथा लिहिली गेली असली तरी ती कुठल्याही काळात आपलीच वाटते. कथे मध्ये नवीन काहीच नाही. कॉलेज मधील टाईम पास, प्रेम प्रकरण, दोन कट्टागँग मधील हाणामारी, प्रेमाचा त्रिकोण, प्रेमभंग, प्रेम मिळवण्यासाठी केलेला आटापिटा … सगळं सगळं तेच वर्षोनुवर्षे चालत आलेल्या बेडेकर लोणची मसाल्या प्रमाणे चमचमीत.  अंकुश चौधरी, स्वप्नील जोशी तसे कॉलेज कुमार वाटत नाहीत पण ठीक आहे. स्वप्नील ने रंगवलेला श्रेयस क्यूट दिसतो … सध्या तरी मराठी मध्ये चॉकलेट हिरो (उणे १० किलो) तोच असेल. त्या उलट अंकुश चौधरीने वठवलेला दिग्या उर्फ डी.एस.पी. थोडा जाडा धष्टपुष्ट चालला असता. जितेंद्र जोशीच्या वाट्याला आलेला खलनायक साई हा त्याने छान सादर केला आहे. खास जितेंद्रच्या पठडी तले डायलॉग ऐकायला मज्जा येते. सई ताम्हणकर आणि उर्मिला कानेटकर छान दिसल्या आहेत.  पूर्वार्धात भरपूर टाईमपास करणारा हा चित्रपट उत्तरार्धात कथे मधील ट्विस्ट घेऊन समोर उभे राहतात. पूर्ण चित्रपट भर चालू घडामोडी आणि flashback चा चांगला मेळ साधला आहे. रेट्रो काळातील वातावरण निर्मिती इस्टमन कलर मुळे, कलाकारांच्या कपड्यांमुळे आणि एकंदरीत कमी इंग्रजाळलेल्या संवादांमुळे चांगली जमली आहे. कुठल्याही मोक्याच्या जागी वेळ न दवडता चित्रपट वेगाने पुढे सरकतो. मग त्यात पोलीस स्टेशन मधील सीन असो किंवा शिरीन आणि श्रेयसचे लग्न असो. कथा अशी आहे की अजून ५-६ गाणी आरामात बसली असती पण मोजकीच आणि सुश्राव्य गाणी योग्य ठिकाणी येत असल्याने चित्रपटाची एकसंधता कुठेही भंग होत नाही. कट्टा लोकेशन अजून चांगल्या पद्धतीने घेता आले असते. एकंदरीत काय तुम्हांला दुनियादारी कादंबरी माहित नाही??? काही हरकत नाही पण हा एव्हरग्रीन तरुणाईचा चित्रपट बघायलाच हवा.

२. “सु.शि.” आणि “दुनियादारी” जीव की प्राण असलेल्या वाचकांसाठी.

एका वाक्यात सांगतो …. चित्रपट गृहाच्या आजूबाजूला देखील फिरकू नका. कुणी जबरदस्ती ने कथा सांगण्याचा प्रयत्न केला तर ऐकू नका. “दुनियादारी”ची परीक्षणे आणि त्यांना मिळणारया चांदण्यांकडे दुर्लक्ष करा. हा प्रेमळ सल्ला न जुमानता गेलात तर बाहेर पडताना या “दुनियादारी” ला दरीत लोटून याल. संजय जाधव, चिन्मय मांडलेकरच्या नावाने लाखोली घालाल आणि “सु. शि. तुम्हांला माफ करणार नाहीत” असं काहीतरी झोपेत देखील बडबडाल. याचे एकमेव कारण म्हणजे तुम्ही दुनियादारी जगला आहात. प्रत्येक पात्र अगदी श्रेयस पासून ते एम् के पर्यंत आजमावले आहे. हा पूर्वग्रह तुम्हाला स्वस्थ बसू देणार नाही. मुळात ही कादंबरी ३ तासाच्या चौकटीत बसूच शकत नाही. पुस्तकातील कथा पडद्यावर आणताना संजय आणि टीम ने भरपूर स्वातंत्र्य घेतलेले आहे. त्यामुळे ही “सु.शि.”ची कथा वाटत नाही. सगळ्या नातेसंबंधामधील गुंताच पडद्यावर सुटा झालेला आहे. तुम्हांला अभिप्रेत असणारे दिग्या, श्रेयस, साई, शिरीन, एम् के, राणी मां या “दुनियादारी” मध्ये दिसणार नाहीत. पडद्यावरचा त्यांचा इस्टमनकलर पार फिका वाटेल. तुमच्या मेंदू मध्ये, हृदया मध्ये घर केलेल्या दुनियादारीला जबरदस्त धक्का देण्याचे काम हे सगळे करतील.  कुठल्याही पात्रांचे कादंबरीच्या मानाने फार कमी पैलू हाताळले गेलेले आहेत. थोडक्यात काय तर जी कलाकृती एखाद्या धारावाहिक मध्ये उत्तम रित्या मांडता आली असती तिला कल्पनेच्या बाहेर संकुचित करून ३ तासात दाखवण्याचा अट्टाहास म्हणजे “दुनियादारी”. सु.शिंच्या कट्ट्यावरील मित्रांना, त्यांच्या चाहत्यांना त्यांच्या “दुनियादारी”ची ही मोडतोड कधीच पाहवणार नाही हे निश्चित.

9 thoughts on “टिक टिक वाजते डोक्यात

 1. ‘शाळा’ चं गरम दुध पिउन भाजलेलेया जीभा आता ‘दुनियादारी’ चं ताक फुंकुनच पिणार हे तर ओघाने आलंच तेव्हा अपेक्षाभंगाची अपेक्षा गृहीत धरलीच आहे. 🙂 🙂

  पण तरीही काय खुपणार आहे हे अजमावण्यासाठी तरी ‘दुनियादारी’ नक्की बघायचाय. 🙂

  • एक चित्रपट म्हाणून छान आहे … बाकीच्या टुकार हिंदी आणि मराठी चित्रपटांपेक्षा.
   बघायला हवाच. 😉
   धन्यवाद.

 2. digya ani shreyas changle vattat pan bhumika youngsters sathi aahe hay dhyanat gheoons roll accept karayacha hota,,,sai ni collega dress vaparla asta tari changle vatle aste any how picture changla aahe

 3. part 2 ..agreed… mulat tyat shreyas n shirin ch lagn zaalel dakhawaly. khar tar tithech to “duniyadari ” rahat nahi. 😦 khar tar “duniyadari ” cha nakki kaay borya udawlay te pahayala tari janar hote. pan ata tuza part 2 wachun kadichahi interest urala nahi.

 4. <>>

  प्रचंड सहमत ! हे आधीच एका मित्राकडून कळालेले असल्यामुळे मी मोह टाळला. त्या पैशात ’दुनीयादारी’ची अजुन एक प्रत खरेदी केली आणि एका अशा मित्राला ज्याने दुनीयादारी वाचलेले नाही, गिफ़्ट केली. 🙂

 5. फिल्म मस्त आहे ,आवडला, नक्की बघा…..पण पुस्तकाची मजा वेगळीच…
  फिल्मवाले किती पण म्हणोत श्रेयस हिरो आहे पण पुस्तक प्रेमींचा हिरो एम.के.च.. 🙂

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s