चहाट(वा)ळकी -११: पशुत्व ०२

आपल्या मागे पोलिसांचे, गुंडांचे नसते लचांड नको म्हणून डोळ्या देखत एखाद्या स्त्रीवर होत असलेला अन्याय होतोय हे दिसत असून सुद्धा डोळ्यावर कातडी ओढून आपण निघून जातो. पण गण्यासारखे बोटावर मोजण्या इतके असलेले खऱ्या अर्थाचे पुरुष या प्रचंड संख्येने असलेल्या वासनांध नजरेला किती पुरून उरणार? पाच पांडवांच्या पांचालीला देखील स्वतःचे शील वाचवण्या साठी कृष्णाचा धावा करावा लागला. तिथे तर एकाच दुःशासन होता इथे तर पावलागणिक सापडणारे दुःशासन पदराला हात घालायला आसुसलेले असतात.

“गण्या, अरे हे असेच चालत राहणार. जो पर्यंत स्त्री हि भोग्य वस्तू आहे आणि शारीरिक बळाच्या आधारावर तिला नामोहरम करता येते, तिचे खच्चीकरण करता येते असे मानणारे पुरुषी वर्चस्व, पुरुषी अहंकार जो पर्यंत समाजात उघडपणे वावरत आहे तो पर्यंत स्त्रियांवरील अत्याचार कमी होणार नाहीत. आणि याच अहंकाराला खतपाणी घालायचे काम करतात त्या समाजातल्या भेदरलेल्या नजरा आणि लाचार मनोवृत्ती. खूप मोठ्या प्रमाणावर समाज प्रबोधनाची गरज आहे.” – मी

“अहो साहेब, हे असे प्रबोधन वगैरे करत बसलो तर बघायला नको. दुनियेतले दुःशासन वाढतच राहतील आणि तुमच्या उपदेशांच्या डोसाचा काही एक परिणाम होणार नाही. अश्या लोकांना दिसताक्षणी ठेचून काढणे हाच उत्तम उपाय. या सगळ्याला हातभार लावते ती मिडिया” – गण्या काही आपला सैनिकी खाक्या सोडायला तयार नव्हता. त्याचे ही चूक नव्हते नुसता उपदेश करून परिस्थिती बदलणार नाही. त्याला अनुशासन आणि स्वयंसिद्धता यांची जोड अनिवार्य आहे. Continue reading