विनोदाचा सरदार “जसपाल भट्टी”

image

माझ्या कॉलेज जीवनात हिंदी भाषेतील निखळ विनोद म्हटलं की एकमेव नाव समोर यायचं ते म्हणजे जसपाल भट्टी. सरदारांवर असलेले विनोदी किस्से बरेच होतात किंवा त्यांच्या नावावर खपवले जातात. पण अस्सल विनोदाचा सरदार हा एकमेव …”जसपाल भट्टी”. त्यावेळी वाहिन्यांची तोबा गर्दी नव्हती ….दूरदर्शन हेच एकमेव दृकश्राव्य माध्यम. फ्लॉप शो आणि उल्टा पुल्टा अश्या विनोदी मालीकांद्वारे त्याकाळी असलेल्या सामाजिक आणि राजकीय गुण दोषांवर विनोदाच्या माध्यमाने उपहासात्मक आणि प्रभावीपणे मांडले.

जसपाल भट्टी यांचा जन्म ३ मार्च १९५५ रोजी अमृतसर येथे झाला. पंजाब इंजिनियरिंग कॉलेज, चंदिगढ येथून त्यांनी अभियांत्रिकी शिक्षणाची पदवी घेतली. परंतु पेशाने ते कलाकार, दिग्दर्शक आणि निर्माता होते. २४ हिंदी/पंजाबी चित्रपटांमध्ये त्यांचा सहभाग होता. तसेच ५ मालिका त्यांनी प्रस्तृत केल्या होत्या. त्यातील सर्वात लोकप्रिय होत्या त्या फ्लॉप शो आणि उल्टा पुल्टा.

आज दिनांक २५ ऑक्टोबर २०१२ रोजी पहाटे १ च्या सुमारास या महान विनोदवीराचा कार अपघातात दुर्दैवी अंत झाला. देवा! त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश चरणी प्रार्थना.

अधिक माहिती:
http://en.wikipedia.org/wiki/Jaspal_Bhatti
http://www.jaspalbhatti.com/

4 thoughts on “विनोदाचा सरदार “जसपाल भट्टी”

 1. माझ्या लहानपणीच्या आठवणींमधे फ्लॉप शो आणि उल्टा पुल्टाचा उल्लेख न विसरता येतोच. किंबहूना manager ला damager वगैरे म्हणणं आणि त्यातला विनोद समजण्याची सुरूवात तिथूनच झाली. अशी ’भट्टी’ पुन्हा जमणे नाही!!

  तुमची ही पोस्ट अजून मोठी हवी होती अशी माझी वैयक्तिक इच्छा. सध्या मला स्वत:ला लिहीता येत नाहीये पण तूम्ही अजून लिहा शक्य झाल्यास….

  जसपाल भट्टींना श्रद्धांजली !!

  • तन्वी ताई,
   जसपाल भट्टी दूरदर्शनच्या काळात खुपच प्रभावी होते. वाहिन्यांची भाऊगर्दी झाल्यावर ते कुठे तरी हरवून गेले. कितीतरी विनोदी मालिका आल्या पण सामाजिक बांधिलकी वरून विनोद निर्माण करणाऱ्या फारच कमी होत्या आणि आहेत.
   जसपाल भट्टी यांच्याबद्दल अजून लिहिणे खरंच आवडेल. बघू कितपत जमतंय.

 2. शीर्षक चुकीचे वाटते… “विनोदाची भट्टी जमलेला एकमेव सरदार” असे हवे होते… तसे पुण्याचे जुने महापौर मोहनसिंग राजपाल हे देखिल सरदारच पण “त्यांना कुठल्या कॅटेगोरीत समाविष्ट करायचे ते आम्हांस अजून कळले नाही” हा खरा विनोद….

  • धन्यवाद शिरीष साहेब, अनुविनाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. तुम्ही सुचवलेले शीर्षक जास्त सयुक्तिक वाटते. …
   अशीच भेट देत जा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s