नवी पहाट

आज संध्याकाळी सूर्य देवता सरत्या २०१३ वर्षाला बरोबर घेऊन अस्ताला जाईल आणि उद्या येताना एक नवी पहाट घेऊन येईल ….. २०१४ ची नवी पहाट. तसं बघायला गेलं तर निसर्गाच्या ऋतूचक्राच्या नियमा प्रमाणेच घडणार्या या सगळ्या घटना. सूर्याचे अस्ताला जाणे …. आकाशातील चंद्राचे ताराकांसोबत झालेले आगमन. परत सुर्योदया पर्यंत चालणारी त्यांची मोहक लुकलुक. सारे काही निसर्ग नियमानुसार. मग वेगळे ते काय??? वेगळे म्हणजे येणारी पहाट नवीन वर्षाची …. त्याच दिशेला उगवणारी पण नवीन आशा घेऊन येणारी.नवीन स्वप्ने जागवणारी … नवीन संकल्प रुजवणारी.

R2H-NYr-HomePg

खरे तर या लेखाचा उद्देश २०१३ चा लेखाजोखा घेणे हा नाही पण म्हणतात ना जुन्याला बरोबर घेतल्याशिवाय नवनिर्माण (मनसे चे नाही) होत नाही. त्यामुळे २०१३ च्या घटनांवर २०१४ बेतलेले असणार हे निश्चित. २०१३ मध्ये वयाची ३९ वर्षे पूर्ण झाली आणि निदान वयाच्या अनुषंगाने तरी चाळीशी आली असे म्हणायला हरकत नाही. चाळीशी म्हटल्यावर लगेच परिपक्व वाटायला लागले. 😉 आणि २०१३ ने मला बरेच बाबतीत परिपक्व करण्याचा चंग बांधला होता. अनुभवाची गाठोडी प्रचंड फुगली आहे आणि आता “भार सोसवेना” म्हणत खाली ठेवायची आहे.

खरे तर या हि वर्षी सुख दुःखाच्या जमाखर्चात बेरजा वजाबाक्यांची हातमिळवणी करता करता हातचे जाते का राहते हा यक्षपश्न पडला होता. पण घराच्या निष्णात काय-दे पंडितांनी काहीही न देता संख्येला पूर्ण भाग जाऊन बाकी परत शून्यावर आणून ठेवली. हेच शून्य घेऊन आता २०१४ च्या पहाटेचे स्वागत करायचे आहे. मित्र म्हणतील लेका शुद्धीवर असलास तर एक तारखेची पहाट बघणार ना?? पण त्यांना अध्यारुत असलेली पहाट आणि मला ज्या पहाटेचे स्वागत करायचे आहे, या दोन्ही वेगवेगळ्या आहेत याची कृपया नोंद घ्यावी. 😉

२०१३ ने बरेच काही शिकवले. स्वतः बद्दल, इतरांबद्दल, नात्यांबद्दल आणि नात्यातल्या गोत्यांबद्दल देखील. २०१३ येतानाच गोड घटनेची चाहूल घेऊन आले ….आणि आमच्या झोळीत एका सुंदर कन्येचे दान देऊन गेले. काही जुनी नाती नव्या अर्थाने, नव्या रूपाने समोर आली आणि त्यातला वेगळेपणा जाणवला. त्यातली ओढ, जवळीक, आपलेपणा मनात कायम घर करून राहील. खरे तर कुठलाच ऋणानुबंध कसा बांधला जाईल, निर्माण होईल किंवा वृद्धिंगत होईल या वर आपले कुठल्याच प्रकारे नियंत्रण नसते. या सरत्या वर्षी असेच काही बंध अधिक दृढ झाले तर काही हातातून वाळू निसटून जावी तसे निसटून गेले. अर्थात त्याचे सुख ही नाही आणि दुःख हि नाही. कारण ऋणानुबंध हे असेच असतात कधी चिरकाल टिकणारे तर कधी क्षणभंगुरतेचा शाप घेऊन आलेले. ज्या विधात्याने हा सारीपाट बनवला तोच बघेल कुठले प्यादे जवळ आणायचे आणि कुठले दूर न्यायचे. अश्या वेळी आधुनिक वाल्मिकी कविवर्य ग. दि. माडगुळकरांच्या गीत-रामायणातील काही ओळी अगदी हाच प्रत्यय देतात.

दोन ओंडक्यांची होते सागरात भेट
एक लाट तोडी दोघा, पुन्हा नाही गाठ
क्षणिक तेवी आहे बाळा, मेळ माणसाचा.

घरातील वयोवृद्ध सदस्यांच्या वयोमाना परत्वे उद्भवलेल्या आजारपणामुळे क्षणभर का होईना मन अस्थिर झाले पण त्यातून देखील त्या नियंत्यानेच मार्ग दाखवला. अस्तित्वाची लढाई होती पण ती जिंकली यातच काय ते समाधान. पण त्यामुळे मधला काळ कसा गेला तेच कळले नाही.  चांगले डॉक्टर, वैद्यकीय उपचार मिळायला देखील योग लागतात. ते योग जुळून आले हीच जमेची बाजू.

याच वर्षात माझ्या आयुष्यातली अजून एक नितांत सुंदर घटना घडली ती म्हणजे माझ्या दुसऱ्या मुलीचा जन्म. देवाने जणु पुन:प्रत्ययाचा आनंद मिळवुन देण्या साठीच तिचे दान आमच्या पदरात टाकले. आता दोन वेळा कन्यादान करण्याचे पुण्य नशिबात फिक्स. या सान पाउलांनी घरातले वातावरण कसं मस्त टवटवित झालय. मोठ्या मुलीचा बालहट्ट पुरावाताना आणि छोटीच्या बाललीला बघताना २०१४ मात्र मस्त व्यतीत होणार. या सगळ्या व्यापात माझ्या अर्धांगीनीची मिळालेली खंबीर साथ कशी विसरून चालेल. अहो… शड्डु घट्ट रोवलेला असेल तर त्या भोवती बिनधास्त फिरता येतं. अर्थात ती देखिल त्या भगवंताचीच कृपा. हो …. जे जोखड घेउन आपण धावणार त्याची चाके मजबूत हवी… नाही का?? आपल्याला पळवणारा सारथी तोच, चाकाना गती देणारा देखिल तोच. कधी चाबकाचे फटके तर कधी चाकाला लागणारे खड्डे देतानाच पाठिवरुन प्रेमाने हात फिरवून दिशा दाखवणारा देखिल तोच …. वर बसून गम्मत बघणारा.

एक तारखेला सवयी प्रमाणे कॅलेंडरचा महीना बदलायची वेळ येईल पण चालु कॅलेंडरचे पान शिल्लक नसेल. आणि मग लक्षात येईल की नुसते पानच उलटून चालणार नसून पूर्ण कॅलेंडरच बदलणार. २०१४ चे नविन कॅलेंडर …… नवीन आशा आकांक्षा इच्छा संकल्प घेऊन आलेली नविन १२ पाने. येणार्या दिवसावर काट मारायची, चालु पानावरचे आकडे असलेले चौकोन संपले की पान उलटायचे. एक कालचक्रच आहे ते अनादी अनंतकाळ चालणारे. पाने उलटून नविन महीन्याची सुरुवात आपण केली तरी रोजनिशी लिहिण्याचे काम मात्र दैवी लेखणी ने केलेले असते. काही पाने सुखाची तर काही पाने दुखाची …. १२ पाने संपली की कैलेंडर बदलणे हेच आपुल्या हाती.

सर्व मित्र मैत्रिणींना, त्यांच्या परिवाराला, अनुविना च्या वाचकांना नव-आंग्ल-वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

सुमंगल प्रकाशनच्या कृपेने जे कालनिर्णय इतके वर्ष आपल्या घरातील भिंतीची शोभा वाढवत होते तेच कालनिर्णय आता मोबाईल फोन साठी पण उपलब्ध आहे. खालील दुव्यांवरून आपण ते मिळवू शकता.
Android | iPhone

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s