प्रेमाचा तिळगुळ …. तुझ्यासाठी खास

tilgulतिळगुळ नाही दिलास तरी चालेल पण बोलण्यात सगळी रुची असू दे …. पदार्थाला चव येण्यासाठी चिमुट चिमुट लागणाऱ्या गोष्टीच खर तर गरजेच्या. मिठाचे म्हणशील तर चव खारट होण्या पेक्षा चिमटीत कमी आले तरी चालेल. आणि तशीही तू नमकीन प्रकारात येतेस. :-D. प्रसंगी मिठ्ठास बोलण्या बरोबर तिखट तडका पण बरा वाटतो. तेलाचा तवंग असलेली लाल तर्री आणि त्यात मुरलेले तुझे प्रेम … संसारात असाच तडका असावा पण तडाखा मात्र नको. गरम गरम कांदे पोहे किंवा वाफाळलेला वरण भात आणि त्यावर पिळलेले दोन तीन लिंबाच्या रसाचे थेंब. मुळात असलेल्या चवीला एक वेगळीच रुची देणे इतकेच त्या दोन चार थेंबांचे काम. तसंही लिंबू सरबतामध्ये चवी साठी साखर आणि मीठ चिमुट असतेच कि नाही. अवचित आलेला कारल्याचा कडूपणा देखिल आवडतो चाखायला. पण त्यात रागाचा अंश कमी असावा म्हणजे ती कडू चव जिभेवर जास्त काळ रेंगाळणार नाही. शेवटी काय सगळच गोड गोड असेल तर बाकीच्या चवीची लज्जत कशी कळणार. तुझ्या माझ्या प्रेमात या सगळ्याच चवींना सारखेच महत्व आहे ….. म्हणून तर तिळगुळ नाही दिलास तरी चालेल ……. नाहीतरी केवळ सणावारी गोड बोलणारे काही कमी नाहीत. अश्यांनी दिलेल्या गोड तिळगुळाची चव सरते शेवटी तोंड थोडं कडवट करून जाते. त्या पेक्षा आपला मिसळण्याचा डबा मस्त.

(फोटो आंतरजालावरून साभार)

4 thoughts on “प्रेमाचा तिळगुळ …. तुझ्यासाठी खास

Leave a reply to सुहास गोखले उत्तर रद्द करा.